सुशांतच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांचा मोठा खुलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुशांतने आत्महत्या केली कि काही घातपात झाला याबाबत पोलीस प्रशासन शोध घेत आहे.

दरम्यान सुशांतच्या केस प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे.

या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला

असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता.

यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार,

सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment