प्रेम काळे याने राष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण करावे : आ. संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आजच्या विद्यार्थ्याला करिअर करता येते. यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर विविध शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश संपादन करुन देशाचे नाव उज्वल करुन एखाद्या शासकीय अधिकारी होण्याचा मान मिळवू शकतो.

धावपटू प्रेम काळे याला राष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हालाकीची आहे.

कुटुंबाची उपजिविका चालविणारे आई-वडील स्वत: मोलमजुरी करत आहेत. पायात फाटलेले बुट घालून प्रेम काळे याने धावण्याचा सराव सध्या करत आहे.

शालेय स्पर्धेमध्ये राज्यपातळीवरील विविध मानांकन मिळविलेले आहे. त्याला आता राष्ट्रीय पातळीवर भाग घेऊन राष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न बाळगत असून, ते पूर्ण करण्यासाठी त्याला मदतीची गरज आहे. १0 किमीचे अंतर अवघ्या ३४ मिनिटात तो पार करतो.

यासाठी आम्ही त्याला स्पोर्ट कीटचे साहित्य भेट देऊन पोषक आहारही देण्यात आलेला आहे. पुढील काळातही त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

प्रेम काळे याला राष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी स्पोर्ट कीट व पोषक आहाराची भेट देताना आ. संग्राम जगताप. समवेत पै. अंकुश चत्तर, पै. प्रताप गायकवाड, दिनेश मोरे, शिवाजी कावडे, संताष ढाकणे,

अभिनव गायकवाड, अँड. मयूर डोके, पै. मयूर सोमवंशी, सादीक शेख, सुजित क्षेत्रे, झाहीद शेख, अँड. हर्षल डोके, रामा तिवारी, अभि तिरंदाज, संभाजी कर्डिले, रमेश पुरी, गणेश बारगजे, संदीप माने आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अंकुश चत्तर म्हणाले की, तपोवन रोड परिसरामध्ये राहणारा प्रेम काळे फाटलेल्या बुटावर धावण्याचा सराव करत असल्याचे समजले.

धावण्यामध्ये शाळेच्या विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन त्याने राज्यपातळीवर आपला ठसा उमटविला आहे. त्याला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची इच्छा आहे.

परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याची इच्छा अपुरी राहू नये, यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर लगेच त्याला शालेय क्रीडा स्पर्धेचे साहित्य व पोषक आहार देण्याच्या सूचना केल्या.

त्या लगेचे अंमलात आणून काळे यास देण्यात आले. असे ते म्हणाले. यावेळी प्रेम काळे म्हणाला की, अडचणीवर मात करुन एकदिवस नक्कीच यशस्वी खेळाडू होऊन दाखवेल.

घरी आई-वडील मोलमजुरी करत असताना त्यांचे कष्ट मी जवळून अनुभवले आहे. लहानपणापासून मला धावण्याची आवड आहे. विविध अडचणी येत आहेत.

त्यावर मात करुन मी नक्कीच यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. आ. संग्राम जगताप यांनी जी मोलाची सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचा क्रणी आहे, असे तो म्हणाला. फोटो ओळी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment