अहमदनगर ब्रेकिंग : चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- हातावर राखी बांधून घेत आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या भाऊ- बहिणीचे नाते जगावेगळे असते. मात्र याच नात्याला काळिमा फासण्याचे काम जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडले आहे.

संख्या चुलत भावाने आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले व यामध्ये मुलगी गरोदर राहीली. या कृत्यास जबाबदार असलेल्या त्या मुलीच्या सख्ख्या चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरातील एका इमारतीमध्ये दोन भावांचे कुटुंब रहाते.

त्यातील एकाचा हातगाडीवरील खाद्य पदार्थांचा व्यवसाय आहे. ते त्यांची पत्नी, मुलगा व मुलीसह राहतात, तर त्यांचा भाऊ पत्नी व दोन मुलांसह त्याच इमारतीत राहण्यास आहे. साधारण तीन महिन्यांपूर्वी पहिल्या कुटुंबातील मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या चुलतभावाने आपल्या बहिणीशीच लगट करण्याचा प्रयत्न केला,

मात्र त्या मुलीने त्यास प्रतिसाद न देता सदरची बाब घरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या चुलत भावाने तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला त्यापासून परावृत्त केले. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी सदर तरुणाने इमारतीत ‘ती’ मुलगी सोडून अन्य कोणीही नसल्याचे पाहून आपल्याच बहिणीवर अत्याचार केला.

घडलेले घटना कोणास सांगू नका नाहीतर मारून टाकेन अशी धमकी देत आरोपी पीडितेवर वारंवार अत्याचार करत राहिला. दरम्यान काही दिवसांनी मुलीचे पोटं दुखु लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. दवाखान्यात नेले असता सदरची तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.

डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्या पालकांनी याबाबत संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी थेट लोणीच्या प्रवरा रुग्णालयात जावून त्या मुलीचा जवाब नोंदविला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून आज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची रवानगी 8 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment