आ. रोहित पवारांची ‘ती’ कार्यतत्पर्ता पाहून बळीराजा आनंदला ; एकाच दिवसात केले ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा कामाचा धडाका आणि त्यांची कर्तव्यतत्परता सर्वांनाचं माहित आहे.

त्याच्या कामाच्या धडाक्याने त्यांनी आजपर्यंत अनेक काम मार्गी लावले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून बळीराजाची मने वेधली आहेत.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव भरुन घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन

एका दिवसात १० जेसीबीच्या माध्यमातून सात किलोमीटरच्या कालव्याची दुरुस्ती केली अन्‌ महारुळी (ता. जामखेड) येथील तलाव भरुन घेतला.

आमदार पवारांनी दाखवलेली कार्यतत्पर्ता पाहून येथील बळीराजा सुखावला. चाळीस वर्षात पहिल्यांदाच अशा पध्दतीने तलावात पाणी पोहचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब पवार ऊर्फ बी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारला होता.

या तलावामुळे पंचक्रोशीतील विहिरींच्या स्रोताला बळकटी मिळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, असा उद्देश होता. मात्र पाऊसाच्या लहरीपणामुळे हा तलाव दरवर्षी भरत नव्हता.

विशेष म्हणजे या तलावापर्यंत पिंपळगाव (आळवा) लघु प्रकल्पाचा सात किलोमीटरचा कँनल पोहचलेला होता. मात्र कँनलही नादुरुस्त असल्याने आवर्तनच बंद होते तर ‘ओहरफ्लो’चे पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही.

तसा विचारही कोणी केला नव्हता. मात्र आमदार रोहित पवारांनी तो विचार केला आणि नियोजन हाती घेतले आणि हा प्रश्न मार्गी लावला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment