आता रिलायन्सने आणली ‘ही’ कोरोना किट ; अवघ्या २ तासांत होणार ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- बाजारातील भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स लाइफ सायन्सेसने कोरोना युध्दात मोठे यश मिळवले आहे.

रिलायन्स लाइफ सायन्सेसने एक आरटी-पीसीआर किट विकसित केली आहे जी जवळजवळ 2 तासात कोरोना संसर्गाचा रिझल्ट देते. सध्या कोविड आरटी-पीसीआरचा निकाल जाणून घेण्यासाठी 24 तास लागतात.

आयसीएमआर (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या निकालांनुसार किटमध्ये 98.7 टक्के संवेदनशीलता आणि 98.8 टक्के विशेषता आहे. आयसीएमआरने त्याला तांत्रिक मान्यताही दिली आहे.

100 पेक्षा जास्त टेस्ट केल्या:-  ईटीच्या अहवालानुसार ही आरटी-पीसीआर किट भारतात कोरोनाच्या 100 पेक्षा जास्त जीनोम अनुक्रमांचे विश्लेषण करून विकसित केली गेली आहे.

कोरोना शोधण्यासाठी आरटी-पीसीआर किट सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी या किटला आर-ग्रीन किट असे नाव दिले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही किट घरगुती तंत्रज्ञानाद्वारे पूर्णपणे तयार केली गेली आहे.

टाटानेही टेस्ट किट तयार केली :- टाटा समूहाने देखील कोरोनासाठी एक टेस्ट तयार केली आहे. हे किट ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने पास केले असून त्याचा वापर मंजूर झाला आहे. टाटाच्या किटचे नाव Feludaअसे आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व देशाचे लक्ष या लशीकडे लागले आहे.

आता याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले देशातील २५ कोटी नागरिकांना जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल.

केंद्र सरकारला कोरोना लसीचे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होतील. पुढील वर्षी २५ कोटी नागरिकांपर्यंत या लसी पोहचवण्याचे लक्ष निश्चित करण्यात आल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाले. ‘संडे संवाद’ कार्यक्रमातून त्यांनी कोरोना संसर्गावरील लसीसंबंधीच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment