डफल्या वाजवत मराठा समाजाने तहसील कचेरीत केले असे काही….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व सर्व मराठा संघटनांच्यावतीने आज (सोमवार ता.5) संगमनेरातील तहसील कार्यालयाच्या आवारात धडक मोर्चा नेण्यात आला.

यावेळी हलगी-तुतारीच्या पारंपारिक नादात ‘आरक्षण आमच्या हक्काचं-नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणांसह छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शासनाचे लक्षे वेधले.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असूनही, अद्याप हा तिढा सुटला नाही. मागील वर्षी लाखोंच्या संख्येने तरीही शांतता व शिस्तब्ध पध्दतीने निघालेल्या 58 मोर्चांची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली.

राज्यात मराठा समाजाचे मोठे व दिग्गज नेते, राज्यकर्ते असूनही त्यांच्या खेकडा वृत्तीमुळे हा विषय निकाली निघाला नाही. आजवर शांततेच्या मार्गाने अधिकार व न्यायहक्कासाठी लढणारा हा समाज, प्रसंगी तितकाच आक्रमकही होवू शकतो.

म्हणून या प्रश्नी राजकारण न करता राज्य सरकारने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी केले. या वेळी शरद थोरात, खंडू सातपुते, अशोक सातपुते,

राजू सातपुते आदींनी त्यांचे विचार व्यक्त केले. सुमारे तासभर वाद्यांच्या गजरात चाललेल्या या ठिय्या आंदोलनाची सांगता निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना मागण्यांचे निवेदन देत करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment