एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. 

झावरे यांनी आ. लंके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरावर अलिकडेच टिका केली होती. त्यावर आ. लंके यांनी झावरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्य केंंद्रामध्ये १ हजार १५० रूग्ण बरे होउन घरी परतल्याच्या पार्श्‍वभुमिवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. लंके यांनी आरोग्य केंंद्रातील सुविधा,

तेथे उपचार घेतलेले रूग्ण तसेच राज्य पातळीवर या सेंटरची घेण्यात आलेली दखल यासंदर्भात माहीती दिली. यावेळी आ. लंके यांनी इतर विषयांवरही भाष्य केले. दादा शिंदे, अ‍ॅड राहुल झावरे, अरूण पवार, बाळासाहेब खिलारी, संदीप चौधरी, शरद झावरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आ. लंके म्हणाले, राज्यभरात दखल घेतली गेलेल्या या आरोग्य केंद्रावर जे टीका करीत आहेत, त्यांनी प्रथम आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक दिवस भाकरी वाटून हातभर बातमी छापून जाहिरातबाजी करणारांचे कोरोना काळातील योगदान काय ?  हे त्यांनी प्रथम जाहिर करावे.

चार दोन लोकांना किराणा किट वाटून गवगवा करणारेही अनेक पाहिले. आम्ही ९५ लाख रूपयांचा किराणा वितरीत केला. त्याचा कोठे गवगवा केला नाही. काही बचतगट समाजसेवी संस्था यांच्याकडून त्यासाठी मदत घेण्यात आली. परगावच्या, परराज्यातील नागरीकांची निवारागृहात निवासाची भोजनाची सोय केली.

त्यांना  त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. लोकप्रतिनिधीचे हे काम आहे ते मी प्रामाणीकपणे पार पाडले. आरोग्य केंद्रासाठी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून खर्च करण्यात येत आहेत. अनेक मान्यवर पंगतीच्या माध्यमातून सुरूची भोजनाची व्यवस्था करीत आहेत.

तेथील व्यवस्था पाहून अन्नदान करणारांची संख्या इतकी वाढली आहे की, पुढील महिनाभराच्या पंगती आजच बुक झालेल्या आहेत. पक्षाचे, प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते येथेच वाढदिवस साजरा करून रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.  सर्व काही प्रामाणिकपणे सुरू आहे असे असताना राजकीय हेतूने  प्रेरित होउन टिका करणे योग्य नसल्याचे लंके म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment