अन्यथा आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  मराठा समाजाच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा; अन्यथा आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने राज्य सरकारने तातडीने पावले उचलून त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असल्याने

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या

मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांत १२ टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात,

मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलिस व इतर कोणतीही भरती करण्यात येऊ नये, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससी परीक्षा घेऊ नयेत, संसदेत स्वतंत्र कायदा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निवेदन पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले. या आंदोलनात विक्रम गाढे, देवेंद्र लांबे, संपत वाबळे, नितीन पानसरे, अमोल वाणी, उद्धव गागरे, राजेंद्र खोजे,

नवनाथ सप्रे, अमोल डौले, तुषार भुजाडी, संदीप गाढे, अविनाश क्षीरसागर, दिनेश झावरे, संदीप तांबे, अण्णासाहेब तोडमल, राजेंद्र लबडे, विक्रम मोढे, महेंद्र शेळके, सुभाष जुंदरे, विनायक बाठे,

दत्तात्रय अडसुरे, अरुण निमसे, मच्छिंद्र गुंड, मधुकर घाडगे, विजय पवार, रणजित चव्हाण, विशाल पटारे, राजेंद्र लांबे, राहुल शेटे, सचिन बोरुडे सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment