हायवेवर धावणाऱ्या कारचा अचानक फुटला टायर…पहा पुढे काय झाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने वाहनांचे अपघाता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

यातच महामार्गावर नेहमी वाहन अपघाताच्या घटना घडलं असतात.संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील

गतिरोधकवर दोन कारचा अपघात होवून केवळ दैव बलवत्तर असल्याने पाचजण बालंबाल बचावले असल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी कि, कार क्रमांक (जीजे.19, एएम.6163) व दुसरी कार क्रमांक (एमएच.15, जीएक्स.9566) या दोन्ही कार सोमवारी संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जात होत्या.

दुपारी दोन्ही कार आंबीखालसा याठिकाणी असलेल्या गतिरोधकवर आल्या असता त्याच दरम्यान एका कारने दुसर्‍या कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पहिल्या कारचा टायर फुटून ती थेट दुभाजकावर चढली.

तर दुसरी कार बाजूला गेली. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर असल्याने दोन्ही कारमधील पाच जण बालंबाल बचावले. मात्र अपघातामध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सदर घटनेची माहिती समजताच पोलीस पथके घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनांना महामार्गावरून बाजूला घेण्यात आले.

दरम्यान आंबीखालसा येथील गतिरोधकवर पांढर्‍या रंगाचे पट्टे न मारल्याने वरुन येणार्‍या छोट्या-मोठ्या वाहनचालकांच्या लक्षात हा गतिरोधक येत नाही.

दरम्यान संबंधित विभागाने या गतिरोधकवर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारावे व महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांतून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment