Ahmednagar NewsPolitics

शिवसेना व राष्ट्रवादीचा कर्डिलेंवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शिवाजी कर्डिले यांनी स्वत:च्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही,

कुटुंबाचा वाली झाला नाही तो कार्यकर्त्यांसाठी काय करणार असा सवाल करत राष्ट्रवादीचे केशव बेरड व शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावर खरपूस समाचार घेतला आहे.

माजी मंत्री कर्डिले यांनी नगर तालुक्यातील खडकी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याचा डाव असल्याची टीका केली होती. यावर पत्रकाद्वारे बेरड, भगत व गोविंद मोकाटे यांनी शेलक्या शब्दात कर्डिले यांचा समाचार घेतला. मुलाला राजकारणात आणण्यासाठी ज्यांनी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही.

कुटुंबाचा वाली झाला नाही तो कार्यकर्त्यांना काय करणार याची जाणीव झाल्याने पुतणेही दूर गेले आणि कार्यकर्तेही दूर गेले आहेत. आजवर शिवसेना साथ देत होती म्हणूनच तुम्ही आमदार होत होते. यावेळी शिवसेनेने राहूरीमध्ये राष्ट्रवादीला उघड साथ दिली. त्यामुळेच तुमचा पराभव झाला हे विसरू नका.

आमदारकी गेल्यापासून त्यांच्याकडे कोणी जात नाहीत ते स्वत:च आता कार्यकर्त्यांना फोन करून बोलून घेतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठी मोठी विधाने करतात. राज्यातील महाआघाडी सरकारची चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या अस्तित्वाची चिंता करा. असेही पत्रकात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button