अहमदनगर ब्रेकिंग; के.के.रेंजचा प्रश्न तूर्तास स्थगित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील के के रेंज संदर्भातील पाच गावांचा प्रश्न तूर्तास स्थगित झालेला आहे. त्या गावातील लोकांनी घाबरून न जाता व कुठल्याही भूलथापांना बळी न पडता या गावांमध्ये सध्या भूसंपादन होणार नाही.

याबाबतची बैठक स्टेशन हेडकॉटर अहमदनगर येथे कर्नल जी.आर.कानन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले असे पारनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.

पारनेर तालुक्यातील के.के. रेंज क्षेत्र आर-2 सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील 5 गावे आहेत या गावातील लोकांच्या मानगुटीवर के. के रेंज चे भुत होते मात्र सध्या काही कालावधीसाठी ते भुत दुर झाले आहे असे म्हणावे लागेल. पारनेर तालुक्यातील वनकुटे,

पळशी, वडगाव सावताळ, गजदीपूर, ढवळपूरी या गावांचा समावेश आहे, या गावातील लोकांनी घाबरून जाऊ नये. या भागात भूसंपादन होणार नाही,फक्त सरावासाठी अधिसूचना आहे. ती गेल्या 1969 सालापासून त्यावेळी आर टू मधील लोकांनी घराबाहेर पडू नये असे संरक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.

याबाबत  दर पाच वर्षांनी याबाबत नूतनीकरण केले जात होते तसेच ते 2021 नव्याने नूतनीकरण होणार आहे या भागांमध्ये फक्त सराव होणार आहे, यामध्ये आर वन व आर टू अशा प्रकारे सराव चालू असतो. त्यामागचा हेतू असतो त्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांचा प्रश्न हा निकाली निघाला आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता व कुठल्याही भूलथापांना बळी न पडता काळजी करू नये. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असून, त्यांनी फक्त आपल्या या क्षेत्रामध्ये कारखाने व इतर उद्योग व्यवसाय चालू झाले नाहीत ना याची पाहणी करण्यासाठी सर्वे केला होता,

मात्र लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतला. यापुढील काळामध्ये लोकांनी कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, तूर्तास या क्षेत्रात अधिग्रहण होणार नाही . असे पत्रकार परिषदेत तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment