‘हम सब एक हे’ गटबाजी मिटवण्यासाठी शिवसेनेकडून संयुक्त बैठकीचे आयोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली होती. पदधिकऱ्यांकडून एकमेक्नावर आरोप- प्रत्यारोप करण्यात येत होते.

यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत होती. शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज संयुक्त बैठक घेण्यात आली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,

शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांनी एकदिलाने पक्षाचे काम करण्याचा संकल्प करीत भविष्यात आपसातील मतभेद अंतर्गतस्तरावरच मिटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीस शिवसेनेचे कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. यावेळी बोलताना कोरगावंकर म्हणाले की,

व्यक्ती पूजा करण्यापेक्षा भगव्यचा तेज राखण्यासाठी भेदभाव विसरून मनातील क्लिमिष,जळमट काढून टाकावी व कोणीही स्वहितासाठी संघटनेला बदनाम करू नये.

तसेच नगरमध्ये सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र या हालचालींवर शिवसेना भवन येथून एक टीम कार्यरत होऊन लक्ष घालणार आहे.त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट अथवा बातम्या दिल्यास त्यांच्यावर थेट कडक कारवाई होणार

असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांनी दिला. तसेच पुढील आठवड्यात नगर शहरात नक्षत्र लॉन येथे सभासद नोंदणीची मिटिंग होऊन कार्य सुरु होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment