जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८२० रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ४९ हजार १६७ झाली. बळींची एकूण संख्या ७५९ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३०, खासगी प्रयोगशाळेत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा २६, अकोले १८, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ९, नेवासे ५, पारनेर ७, पाथर्डी १४, राहाता ४, संगमनेर ३, श्रीगोंदे ११, श्रीरामपूर ३, मिलिटरी हॉस्पिटल १६, इतर जिल्हा ४ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी मनपा ५५, अकोले ३५, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव ९, नगर ग्रामीण १७,, नेवासे १२, पारनेर ६, पाथर्डी ७, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर १३६, शेवगाव ५, श्रीगोंदे ३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा ४३, अकोले १३, जामखेड २५, कर्जत २५, कोपरगाव ७, नगर ग्रामीण ३, नेवासे १९, पारनेर १४, पाथर्डी ३८, राहाता २१, राहुरी ३७, संगमनेर २६, शेवगाव २२, श्रीगोंदे १६, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ५ रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात ३६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२० टक्के झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment