Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,वाचा जिल्ह्यातील सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४१५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.५१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३७६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०२ आणि अँटीजेन चाचणीत १५८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०५, कर्जत ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १२, नेवासा ०४,  पारनेर ०६, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी १७, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४७, अकोले ०१, जामखेड ०७, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३,, नेवासा ०५, पाथर्डी २०, राहाता ०२, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०८, मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २०, अकोले १२, जामखेड १४, कर्जत १०,  कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पारनेर ०७, पाथर्डी ३६, राहाता १०, संगमनेर ०१, शेवगाव १६, श्रीगोंदा १९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, अकोले २२, जामखेड ६६, कर्जत ३७, कोपरगाव १४, नगर ग्रा. १३, नेवासा ०७, पारनेर १०, पाथर्डी ४७, राहाता ०४, राहुरी ०६, संगमनेर २२, शेवगाव ३३, श्रीगोंदा ५६, श्रीरामपूर २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:४५७९७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४०१४
  • मृत्यू:७८८
  • एकूण रूग्ण संख्या:५०५९९

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button