‘त्या’ शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे सापडली…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात धोंडीबा गणपत सोनावणे याच्या गट नंबर ७ ब मधील गांजाची ३० झाडे पोलिसांनी शनिवारी जप्त केली. साडेसात किलो वजनाचा हा गांजा ३७ हजार ५०० रुपयांचा आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या पथकाने सोनावणेच्या शेतात छापा टाकला.

तेथे साडेसात किलो गांजा सापडला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

तहसीलदार प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या उपस्थितीत पंचनामा करून गांजा जप्त करण्यात आला.

शेतात गांजाची मोठी झाडे सापडली असल्याची गावात चर्चा होती. ही कारवाई डीबीचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment