आमदार मुलाच्या आईच्या कौतुकास्पद कामाची रंगलीय चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात.

मात्र आता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री त्यांच्या सामाजिक कार्यामुळे कौतुकाच्या धनी बनलेल्या आहेत. आमदार पवार हे सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी आई सुनंदा पवार या अनेक उपक्रमातून मुलाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत.

आपल्या सामाजिक कामात कायम व्यस्त असणाऱ्या आ.रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सध्या कर्जत-जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करत आहेत. त्यांचे स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

‘कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन व्हावी’ हा मूलमंत्र देणाऱ्या आमदार माता सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात करत आहेत. गवत, काट्यात हात घालून परीसर स्वच्छ करण्याची त्यांची ही ‘जिद्द’ अनेक सामाजिक संस्था व नागरिकांना आपल्या जबाबदारीचे दर्शन घडवणारी आहे.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आपल्या तालुक्याचा प्रथम क्रमांक कसा येईल? याबाबत आता तालुक्यामधील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. ‘आधी करावे मग सांगावे’ या वचनाचे पालन करत आता सर्वच जण करताना दिसत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment