सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- सर्वांनी सावधानता बाळगली तर नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्री टोपे हे शुक्रवारी रात्री जालना येथे जात असताना नगरमध्ये काही वेळ थांबले होते.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळित होत आहेत. शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होतील.

आपण सर्वांनी सावधानता बाळगली, तर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया. टोपे म्हणाले, कोरोना तपासणीचे दर खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आठवडाभरात दर आठशे रुपये होतील. टीआरपी घोटाळा, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश यावरही टोपे यांनी भाष्य केले.

राष्ट्रवादीत योग्य लोकांचे नेहमीच स्वागत केले जाते, असे म्हणत टोपे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अधिक बोलणे टाळले. काही चॅनेल्सने टीआरपी घोटाळा करत धूळफेक केली. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment