उपाशी मरण्यापेक्षा परिवारासाठी कोरोना होऊन मेलेले बरे असे वाटत आहे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव शहर सोमवारी होणारा जनावरांचा आठवडे बाजार कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असून आता त्याचा फटका व्यापारी वर्गाबरोबर शेतकरी, गाय पालन, म्हैस खरेदी-विक्री व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक, कुक्कुटपालन, शेळीपालन करणाऱ्यांबरोबर बाजारात छोटे-मोठे धंदे करणाऱ्यांना बसला आहे.

शासनानाने याची गांभीर्याने दाखल घेत बाजार सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा बेलदार संघटना करणार आंदोलन उभे करेल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे व भीमदास जाधव यांनी दिला.

शेतकऱ्यांना बैलांची, दुग्ध व्यावसायिकांना गायी-म्हशींची अदला-बदली करण्याची ही वेळ असून बाजार भरत नसल्यामुळे जनावरे मिळणे अवघड झाले आहे. येवले, नाशिक, धुळे, मालेगाव येथील बाजारपेठ सुरु झाल्या आहेत.

दसरा, दिवाळी, ईद, नाताळ असे सर्व धर्मांचे सण जवळ आले आहेत. कोपरगावात उपाशी मरण्यापेक्षा परिवारासाठी कोरोना होऊन मेलेले बरे असे वाटत आहे.

याचा उद्रेक होण्याअगोदरच प्रशासनाने जनावरांचा आठवडे बाजार सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, अलिम शहा, अनिल गाडे, बापू काकडे, रघुनाथ मोहिते, बंटी सपकाळ,

नितीन त्रिभुवन, जावेद शेख, आनंद परदेशी, सचिन खैरे, संजय जाधव, नवनाथ मोहिते, महाराष्ट्र बेलदार समाजाचे भीमदास जाधव, रघुनाथ मोहिते, संजय जाधव आदींनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment