सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची बंपर ऑफर…दिवाळीआधीच मिळणार एवढे रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही नव्या घोषणा केल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील मागणीला उत्तेजन देण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांना 10 हजार रुपये खास ‘फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स’ देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सितारामन यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थमंत्री यांनी विशेष LTC कॅश स्किम योजना जाहीर केली आहे. याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी डिमांड वाढवण्यासाठी दोन प्रस्ताव ठेवले आहेत

(1) LTA कॅश व्हाउचर स्कीम (LTC Cash Voucher Scheme)

(2) स्पेशल फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स स्कीम (Special Festival Advance Scheme)

स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम – स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम पुढील सहा महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार आपल्या सर्व कर्मचार्‍यांना अर्थव्यवस्थेतील मागणीला उत्तेजन देण्यासाठी 10 हजार रुपयांचा विशेष अ‍ॅडव्हान्स देणार आहे.

कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2021 पर्यंत ही रक्कम खर्च करावी लागेल. स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स योजनेसाठी 4,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.

याशिवाय अर्थमंत्र्यांनी ट्रॅव्हल लीव्ह अलाऊंस (एलटीसी) साठी कॅश व्हाउचर योजनेचीदेखील घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचार्‍यास रोख व्हाउचर मिळणार आहे. ज्यामुळे ते खर्च करण्यास सक्षम होतील.

यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होईल. या योजनेचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्‍यांनादेखील मिळणार आहे.

असे मिळणार पैसे

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या स्कीमसाठी कर्मचाऱ्यांना रुपे प्री-पेड कार्ड मिळेल. हे कार्ड रिचार्ज करावे लागणार आहे. त्यानंतर यात 10 हजार रुपये जमा होती. मुख्य म्हणजे, यासाठी लागणारे बॅंक शुल्क सरकार भरेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment