महापालिकेने केली सर्व कोविड सेंटर बंद; जाणून घ्या काय आहे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत आहे. यामुळे महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे बंद झालेले हे दुसरे कोविड सेंटर आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने आनंद लॉननंतर आता शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटरही बंद केले.

हे कोविड सेंटर 72 दिवस चालले. त्यात 1524 रुग्णांनी उपचार घेतले. कोविड सेंटरसाठी महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील मुले-मुलींची हॉस्टेल ताब्यात घेतली होती.

ही हॉस्टेल सॅनिटाईज केली आहेत. मात्र, अजूनही ती महापालिकेच्या ताब्यात आहेत. शहरातील आयुर्वेद कॉलेजमधील गुरूआनंद कोविड सेंटरही कॉलेज प्रशासनाने बंद केले.

आता शहरातील खासगी हॉस्पिटलव्यतिरिक्‍त नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग, बूथ हॉस्पिटल व कर्मयोगी सेंटर येथे कोविड सेंटर सुरू आहेत.

नगर शहरात आता महापालिकेचे एकही कोविड सेंटर सुरू नाही. कोरोना रूग्ण सापडत नसल्याने संसर्ग थांबला असे वाटत असले तरी नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment