खातेदारांनो जरा लक्ष द्या; SBI ची ऑनलाईन सेवा झालीये ठप्प

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- देशातली सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे.

बँकेनेच ट्विट करत करोडो ग्राहकांना याची माहिती दिली आहे. सध्या बँकेचे ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून फक्त ATM आमि POS मशीन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू असून ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावं लवकरच सामान्य सेवा सुरू होईल असं बँकेनं म्हटलं आहे.

ऑनलाइन सेवा बंद झाली आहे. यामुळे तुम्ही कोणालाही मोबाईल ऍप किंवा मनी टान्सफरिंग ऍपद्वारे पैसे पाठवू शकत नाही.

पण ग्राहकांसाठी एटीएम सेवा सुरू असल्याचं बँकेने म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेकडे जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत. ही संख्या पाहता या ग्राहकांना त्रास होणार आहे.

स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचा बाजारातील हिस्सा 25 टक्के एवढा मोठा आहे. तसेच या बँकेची देशभरात जवळपास 24 हजार शाखा आहेत. एटीएमची संख्याही काही लाखांत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment