शहरातील या भागातील जुगार अंड्यावर पोलिसांचा छापा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु झाले आहे. यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे.

यातच शहरातील सारसनगर परिसरातील येथे सनशाईन हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि.१२) रात्री पोलिसांनी छापा टाकला.

भिंगार पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात छापा टाकून 3 लाख 58 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात एकूण दहा जुगा-यांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे.

या दहा जुगाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात कुमार किसनदास छाबरीया (वय 60 रा. श्रीराम कॉलनी केडगाव), नासीर खान गुलाब खान (वय 53 रा. सी आय व्ही कॉलनी, मुकुंदनगर),

मनीष मच्छिंद्र शिंदे (वय20 रा. पाईपलाईन रोड वैदुवाडी अहमदनगर), माऊली हरिभाऊ बादाडे (वय 20 रा. चिपाडेमळा, सारसनगर), गणेश रामचंद्र राजपूत (वय 60 रा. गवळीवाडा भिंगार),

अजय मधुकर कंडारे (वय 50 रा. सदरबाजार भिंगार), शंकर नारायण जमाल (वय 54 रा. शिवाजीनगर, कल्याण रोड अहमदनगर), विनोद चंद्रर शिंदे (वय23 रा. बुरूडगाव अहमदनगर),

छगन शिवाजी खर्से (वय 35 रा. कवडगाव ता.नगर), काळू मारुती शिंदे (वय 40 रा. वैदुवाडी सावेडी अहमदनगर) या दहाजणांना पकडण्यात आले असून बाबासाहेब कर्पे (रा. सारसनगर) हा फरार झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment