शहरातील त्या मेडिकल ऑक्सिजन पुरवठादार एजन्सीवर दंडात्मक कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मात्र, रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करताना व्यापाऱ्यांकडून जादा किंमत आकारण्यात येऊ लागल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपूर्वी प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या अहमदनगर येथील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद करण्याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या एजन्सीजसंदर्भात तक्रारी येत असल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयास कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.

अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयामार्फत मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणारी संसथा मे. साई आनंद एजेन्‍सी, स्‍वस्तिक चौक,

अहमदनगर या पेढीची चौकशी केली असुन त्‍याअनुषंगाने या पेढीस सहाय्यक आयुक्‍त (औषधे) अशोक राठोड यांनी काम बंद करण्‍याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment