अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा ११.६६ लाखांचा गुटखा जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- एकलहरे परिसरातील आठवाडी शिवारात गेल्या मंगळवारी गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्धा कोटींचा गुटखा पोलिसांनी जप्त केला होता.

त्याच भागातील बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. पोलिस पथकाने तपासणी केली असता तेथे ११ लाख ६६ हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू मिळाली.

याप्रकरणी पोलिसांनी करीम आजम शेख याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत राहता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा,

वैभव शांतीलाल चोपडा या चुलत्या-पुतण्यांसह लोणीतून फिरोज पठाण अशा चौघांना अटक केली. त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment