कोपरगावात रस्त्यांची झाली चाळण; नागरिकांसह वाहनधारक झाले परेशान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील रस्ते, महामार्ग तसेच महामार्गावरील खड्डे चांगलेच गाजत आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान अशाच खड्डेमय रस्त्यांमुळे कोपरगावकर वैतागले आहे. शहरातील व तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे.

काही रस्त्यांचे काम अर्धवट होऊन रखडलेले आहे तर काही रस्त्यांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. तर ग्रामीण भागातून मुख्य शहराला येणार्‍या प्रत्येक रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसून येते.

यंदाच्या वर्षी मेघराजा संपूर्ण जिल्ह्यावर चांगलाच बरसला आहे. यातच कोपरगाव तालुक्यावर एकदम खुश असल्याने दररोज धो-धो बरसणार्‍या पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील एक ते दोन फूट खोल खड्ड्यांत पाणी साचून डबक्याचे स्वरूप झाल्याचे पहावयास मिळत आहे.

या डबक्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना खूपच कसरत करावी लागते. रस्त्यांवरील वाढते खड्डे हे अपघातास निमंत्रण देत आहे. तसेच रस्त्यांवर पाण्याच्या डबक्यात विषारी प्राण्यांचा देखील वावर असतो.

यामुळे धोका अजून वाढला आहे. दरम्यान प्रशासनाने सदर रस्ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment