स्व. राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता, शिवसेनेचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. म्हणूनच २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश‍न सोडवले.

सामान्यांचे प्रश्‍न सुटावे, त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांची जनसेवेची ही कारकिर्द नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात राहील.

तुमचा आमचा सर्वांचा भय्या त्यांच्या कार्यातून आपल्यात कायम राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. माजी मंत्री खोतकर व माजी आमदार सुरेश नवले यांनी स्व. राठोड यांच्या परिवाराची भेट घेऊन सात्वंन केले.

याप्रसंगी विक्रम राठोड, अमोल ठाकूर, मदन आढाव उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शिवालयात जाऊन स्व. राठोड यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, संजय शेंडगे, राम नळकांडे, निलेश भाकरे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे,

परेश लोखंडे, मुन्ना भिंगारदिवे, अभिषेक भिंगारदिवे, डॉ.श्रीकांत चेमटे, कावळे, अशोक तुपे, अरुणा गोयल आदी उपस्थित होते. माजी आमदार नवले यांनीही स्व.राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment