महाविकास आघाडीचे सरकार धर्मविरोधी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-राज्यातील सरकार कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम शिथिल करून सर्वच क्षेत्राला खुलेआम परवानगी देत असताना केवळ मंदिरे बंद ठेऊन धर्म विरोधी कृत्य करत आहे,

अशी टिका भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी केली. राज्यातील मंदिरे उघडावीत या मागणीसाठी शिर्डी येथे उपोषणाला बुधवारी सुरुवात करण्यात आली.

याबाबत संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. डेरे म्हणाले, हे सरकार राज्यातील बार उघडण्याची परवानगी देते, मात्र भाविकांचे श्रद्धास्थाने असणाऱ्या मंदिरांना बंद ठेवण्याची भूमिका घेते, हे अन्यायकारक आहे.

भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास महाराज, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ,

सुदर्शन महाराज महानुभाव, फुरसुंगीकर महाराज, संजयनाना महाराज धोंडगे, आचार्य जिनेंद्र जैन, कैलास महाराज देशमुख, रितेश पटेल, बबनराव मुठे आदींनी मंदिरे उघडावीत या मागणीसाठी साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून उपोषणाला सुरुवात केली

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment