शिवसैनिक नगरमध्ये पक्षाला पुढे नेण्याचे काम करतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे प्रवक्ते व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी नगरमध्ये शिवालयास भेट देऊन उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा,

संभाजी कदम, अनिल बोरुडे, गणेश कवडे, संजय शेंडगे, काका शेळके, नीलेश भाकरे, सुभाष लोंढे, मदन आढाव, संग्राम शेळके आदी उपस्थित होते. खासदार माने म्हणाले, नगरमध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचे मोठे वलय आहे.

स्वर्गीय अनिल राठोड यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी नगरमध्ये खूप मेहनत घेतली. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांना एकत्रित काम करणे गरजेचे आहे. आपल्याला कोणतीही मदत किंवा येणाऱ्या अडचणीसाठी आम्ही कायम आपल्या सोबत आहोत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment