पावसाच्या पाण्याने पूल गेला वाहून; गावकऱ्यांचे होतायत हाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्रच नद्या नाल्या, तलाव, बंधारे हे दुथडी भरून वाहत आहेत.

या पावसामुळे आता अनेक समस्या निर्माण होत आहे. कर्जत तालुक्यातही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके वाया गेली आहे. तसेच तालुक्यातील राशीन- परिटवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरील पूल पुरात वाहून गेला आहे.

बेलोरा ओढ्यावरील पूल अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

पूल वाहून गेल्यामुळे परिटवाडीसह, पवारवाडी, घरातवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव या गावांची होणारा राशीनचा संपर्क तुटला आहे. ओढ्यालगत गोठे असलेल्या शेतकऱ्यांचे या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुखाद्य, मुरघास, ज्वारीची पोती तसेच वाळत घातलेली मक्याची कणसे पुरात वाहून गेली आहे.

दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!