खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी खुद्द राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागते यापेक्ष राज्याचे दुर्दैव काय? असा सवाल करत माजी पणनमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी करत धार्मिक स्थळे बंद ठेवणे ही राज्य सरकारची विकृती आहे, असा टोलाही राज्य सरकारला लगावला.

तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेले नाही. कोणाचाच कोणावर नियंत्रण राहिलेला नसल्याने सरकार वाचवण्यात सर्व मग्न आहेत.

जनतेच्या प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकाऱ्यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे भाजपने राज्यात आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्न मांडत आहे.

दिलीप गांधी यांचे सारखे मतदारसंघाचा विकास करणारे व्यक्तिमत्व संसदेत पाहिजे होते, असेही ते म्हणाले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली.

गांधी परिवाराच्या वतीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरोज गांधी, देवेंद्र गांधी, अनिल डागा, रोषण गांधी, सागर गोरे, लक्ष्मण बोठे आदी उपस्थित होते.

दिलीप गांधी म्हणाले, हर्षवर्धन पाटील व माझी जुनी मैत्री आहे. भाजपच्या व आघाडीच्याही सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदाची कारकीर्द उत्कृष्ट ठरली. त्यांचे नगरमध्ये स्वागत करतांना आनंद होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment