Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrimeMaharashtra

विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच देशात महिला अत्याचाराच्या घटनांवरून वातावरण तापलेले आहे, यामध्ये अशा घटनांमुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिलेनं सांगितले की,

नाशिक येथे मी, माझे पती, सासु, सासरे व ननंद असे राहत आहे. घरात अनेक दिवसापासून लहान मोठ्या कारणातून सतत वाद सुरु होते.

त्यामुळे मी माहेरी आले होते. त्यानतंर माझ्या सासरकडची मंडळी घरी आली.त्यांनी मोबाईलमधील जुने फोटो दाखवून आमची सून वागण्यात बरी नसल्याचे माझ्या नातेवाईकाना सांगितले.

यावेळी माझी बदनामी करण्याच्या हेतूने अतिशय वाईट गोष्टी सांगण्यात आल्या.यावेळी माझे पती स्वप्निल सापनर, सासरे प्रकाश सापनर, सासू संगीता सापनर (तिन्ही रा. नाशिक),

गोरक्षनाथ सापनर, चुलत सासू पज्ञा सापनर (रा. मुंबई) व चुलत सासरे भागवत सापनर, चागदेव सापनर (रा. नाशिक) यांनी मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

तर पती स्वप्निल सापनर याने नादंवणार नसल्याची धमकी दिली. यावेळी गावात माझे निवडक फोटो दाखवून बदनामी करण्यात आली आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button