Ahmednagar News

निंबळकचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुक्यातील निंबळक गावाला मंजूर असलेला 550 घनमीटरचा पाणीपुरवठा नियमित देऊन गावातील पाणी प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन एमआयडिसी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पीएनजी राठोड यांना निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले.

यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य अविनाश आळंदीकर, बाबा पगारे, बाळासाहेब गायकवाड, अशोक शिंदे, सुभाष कोरडे, जयराम जाधव, विलास होळकर, समीर पटेल, बबन कदम, किसन शिंदे आदि उपस्थित होते.

औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर यांच्याकडून निंबळक ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीला एमआयडीसीकडून मंजूर पाणी कोटा 550 घनमीटर असून, त्याप्रमाणे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र तेवढा पाणीपुरवठा होत नसल्याने गावात पाण्याची टंचाई जाणवत आहे.

काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे मंजूर पाणी पुरविण्यात येत नाही. त्यामुळे कमी पाणी आल्याने ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर मंजूर पाणीपुरवठा कोटा पुढील दिवशीच्या कोट्यामध्ये वाढ करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

तर इतरवेळी मंजूर असलेला 500 घनमीटर पाणीचा कोटा ग्रामपंचायतीला मिळाला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायतीला मंजूर 550 घनमीटर पाणी कोटा सन 2001 च्या जनगणनेनुसार असणार्‍या लोकसंख्येचा विचार करून केला जातो. परंतु ग्रामपंचायतीचे 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 8 हजार 300 इतकी आहे.

आज रोजीची लोकसंख्या अंदाजे 15 हजार पेक्षा जास्त आहे. तसेच एमआयडीसी क्षेत्र जवळ असल्याने तरंगती लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. निंबळक ग्रामपंचायतीला मंजूर कोटा प्रतिदिन 550 घनमीटर प्रमाणे पाणीपुरवठा करावा किंवा ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार तांत्रिक अडचण निर्माण झालेल्या दिवशीचा पाणी कोटा पुढील दिवसाच्या पाणी कोट्यामध्ये वाढवून मिळण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने निंबळक ग्रामपंचायतीने केली आहे.

सदर पाण्याचा प्रश्‍न 23 ऑक्टोंबर पर्यंत न सुटल्यास ग्रामस्थांसह एमआयडिसी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button