भुसार मालाचे खुले लिलाव सुरु; या बाजार समितीने घेतला निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतांश उद्योग धंदे सुरु झाली आहे. यातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे.

श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात सोमवार (ता.19) पासुन भुसार मालाचे खुले लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापनाने नुकताच घेतला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुसार मालाला योग्य दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात नेहमीच भुसार मालाची मोठी आवक असते.

परंतू आडत व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये लिलाव होत. असल्याने आडत्या देईल तो दर शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत.

म्हणुन बाजार समितीने लिलाव पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारचे लिलाव खुल्या प्रकारे होणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाची वाहने आवारात रांगेत उभी करावी लागणार आहे.

यावेळी लिलाव पुकारण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार आहे. बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे भुसार आडत व्यापाऱ्यांकडुन होणारी शेतजकऱ्यांशी लुट काही अंशी कमी होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment