नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी मंदिरात जात केले हे काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट अद्यापही असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करत सणउत्सव साजरे केले जात आहे. यातच नवरात्र सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी मंदिर परिसरात साफसफाईचे काम हाती घेतले आहे. अकोले तालुक्यातील रंधा फॉल येथील घोरपडा देवी येथे दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

उद्या घटस्थापना होणार असून, माजी आमदार वैभव पिचड यांनी देवीच्या मंदिरात जाऊन मंदिराचा गाभारा व हॉल स्वतः सानि टयझर करून प्रेशर पाईप लावून धुतले.

दरवर्षी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी देवीच्या मंदिरात जाऊन पिचड कुटुंबीय घोरपडा देवी मंदिरात जाऊन साफसफाई व घटस्थापनेच्या पूर्व तयारी करतात.

आज सकाळी त्यांनी काही ठराविक कार्यकर्त्यांसह मंदिरात जाऊन मंदिर स्वच्छ केले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विविध देवीमंदिरांत घटस्थापनेचे नियोजन होत असून, नगर जिल्ह्यातही देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment