ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून दारुड्या नवऱ्याने केला बायकोचा खून

0

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील देवळालीप्रवरा परिसरात दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून चिडलेल्या नवऱ्याने बायकोच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून डोके फोडून तिला जीवे ठार मारण्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री ११.३० च्या सुमारास घडला.

या घटनेची खबर मिळताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दीपाली काळे, डिवायएसपी डॉ.राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेंट दिली.

Advertisement

आरोपी नवरा बाबासाहेब विठ्ठल बोलवड,रा.आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा यास अटक करण्यात आली असल्याची माहिती डिवायएसपी राहुल मदने यांनी दिली.

दरम्यान, या खळबळजनक घटनेप्रकरणी मयत शितल बाबासाहेब बोलवड, वय-३५,रा. आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा या महिलेचे माहेरचे नातेवाईक विजय एकनाथ बर्डे रा. सडे,

Advertisement

ता, राहुरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा बाबासाहेब विठ्ठल बोलवड याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत विजय बर्डे यांनी म्हंटले आहे की,

आरोपी बाबासाहेब बोलवड याने त्याची पत्नी सा.शितल बाबासाहेब बोलवडे हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता तिने नवऱ्याला दारू पिण्यास पेसे दिले नाही.

Advertisement

त्याचा राग आल्याने लाकडी दांड्यांने बायको शितल हिच्या डोक्यात कपाळावर बेदम मारहाण करून तिला घरातच जीवे ठार मारले. या घटनेचा पुढील तपास सपोनि बागुल हे करत आहेत.

दरम्यान, आरोपी खून करून फरार झाला होता. मात्र परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडण्यास पोलिसांना मदत केली आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li