Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : अश्लील चाळे करणारा प्राध्यापक गजाआड

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर येथील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे व संभाषण केले. विद्यार्थिनीने तक्रार दिल्याने विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला गजाआड केले.

आरषू पीरमोहम्मद पटेल (३१, हसनापूर, तालुका राहाता) असे त्याचे नाव आहे. विद्यार्थिनी बाहेरगावाची असून ती शिक्षणासाठी येथे आली आहे. एक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ती राहते.

पटेलने जवळीक साधण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. नापास करण्याच्या धमक्याही दिल्या. दोन वर्षांपासून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिने अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्राध्यापक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

अखेर तिने बुधवारी शहर पोलिसात फिर्याद दिली. पटेलने केलेले कृत्य निंदनीय आहे. संस्थेने विद्यार्थिनीच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली.

दोन महिन्यांपूर्वीच पटेलला सूचना देऊन निलंबित करण्यात आले, असे संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button