ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक घटना : भावाने बहिणीचा डोक्यात हातोडा घालून केला खून ! कारण वाचून तुम्हाला बसेल शॉक…

0

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील केडगावात घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी टिव्ही पाहण्याच्या कारणातून भावाने बहिणीचा हातोडा डोक्यात घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केडगावातील सचिननगर येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील १२ वर्षीय भावाने आपल्या ९ वर्षांच्या बहिणीच्या डोक्यात हातोडा घातला.

Advertisement

यामुळे गंभीर जखमी झालेल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. घरामध्ये दोघे बहिण- भाऊ टिव्ही पाहत होते. त्यांचे आई-वडील शनिवारी सायंकाळी नवीन घर पाहण्यासाठी सावेडी येथे गेले होते.

सायंकाळनंतर बहीण- भाऊ घरामध्ये टिव्ही पाहत होते. काही वेळानंतर टिव्ही चैनल बदलण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादातून भावाने घरामध्ये असलेला हातोडा बहिणीच्या डोक्यात घालून जीव घेतला.

Advertisement

यानंतर भावाने आपल्या मृत बहिणाचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला. भयभीत झालेल्या भावाने घरातील लॅपटॉप व पैसे घेऊन केडगाव बायपास येथील एक हॉटेल गाठले.

तेथे असलेल्या मॅनेजर कडे त्याने नोकरीची मागणी केली. मॅनेजरने त्याच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा हॉटेलवर येऊन नोकरी मागत असल्याची माहिती दिली.

Advertisement

यानंतर सावेडी येथे गेलेल्या आई- वडिलांनी केडगाव येथील घर गाठले. घरामधील बाथरूममध्ये त्यांची ९ वर्षाची मुलगी मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी खून करणाऱ्या बालकाला ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li