दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; शहरातील नागरिक झाले परेशान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी हि सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र याच वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

संगमेनर शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली आणि तिरंगा चौक (मालदाड रस्ता) या दोन्ही ठिकाणांहून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून पोबारा केल्याने

नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील कुंभार गल्ली येथे

वास्तव्यास असणारे कृष्णा सुभाष कर्पे यांची होंडा कंपनीची ड्रीम युगा दुचाकी (क्र.एमएच.17, बीयू.2094) ही रविवारी (ता.11) घरासमोर लावली होती.

परंतु दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून पोबारा केला. त्यानंतर पुन्हा गुरुवारी (ता.15) अज्ञात चोरट्याने शहरातीलच तिरंगा चौक (मालदाड रस्ता) येथील

सचिन कचरू उगले यांचीही दुचाकी (क्र.एमएच.17, एएल.9177) चोरून पोबारा केला. याबबात कर्पे व उगले यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment