घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या भामट्यास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात अवैध धंदे, काळाबाजार वाढला आहे. अशा महाभागांविरोधात पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. यातच घरगुती गॅसच्या इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे.

घरगुती वापराचा गॅस वाहनांसाठी इंधन म्हणून विक्री करणाऱ्या विनायक चंद्रकांत झंझाड या भामटयास पारनेर पोलिसांनी गॅस टाक्या, वाहनात गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशिन तसेच मारूती ओम्नी गाडीसह ताब्यात घेतले आहे

Advertisement

. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथे घरगुती वापराच्या गॅसची वाहनासाठी इंधन म्हणून विक्री होत असल्याच्या तक्रारी पारनेर पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.

ग्राहकांना अनुदानावर देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याने, तसेच या गॅसचा वापर धोकादायक असल्याने पारनेर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत

Advertisement

देवीभोयरे फाटा येथील सागर अ‍ॅटोमोबाईल्स अ‍ॅण्ड टायर्स या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी संबंधित दुकानातून भारत गॅस कंपनीचे ५ सिलेंडर,

वाहनात घरगुती एलपीजी गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन मशिन व एक कार (क्र. एम. एच १६ बी वाय ०२३२) असा एकूण ५७ हजार रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

हा उदयोग करणाऱ्या विनायक चंद्रकांत झंजाड वय ४० (रा. चिंचोली, हल्ली रा. देवीभोयरे फाटा, वडझिरे) या भामटयास अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement