पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने केली आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कटुंबिक हिंसाचार, महिलांची छळवणूक आदी घटनांमुळे आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे.

नुकतीच पारनेर तालुक्यातील एका पत्नीने आपल्या पतीच्या छळास कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. दारू पिणाऱ्या पतीकडून चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने

कंटाळलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निघोज येथे घडली. याप्रकरणी मयत पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत पोलिसांकडून संमजलेली माहिती अशी कि, सन २०१७ ते दि. १४ सप्टेबर २०२० दरम्यान पती विकास साहेबराव दोंदे (वय ३० रा. निघोज, ता. पारनेर) याच्यासोबत सासरी नांदत असताना माळवाडी,

पुणे व निघोज ता. पारनेर येथे पत्नी सोनल विकास दोंदे हीचा शारीरीक व मानसिक छळ होत होता. पती विकास दारू पिउन सोनलवर चारित्र्याच्या संशय घेत असे.

पतीच्या या वारंवारच्या जाचास कंटाळून सोनल हिने आत्महत्या केली. पती विकास याने सोनल हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जयवंत अमृत साठे (वय ३१ रा. वासुंदे ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार विकास दोंदे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी पद्मणे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment