दिलासादायक! जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची नोंद कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

जिल्ह्यातील गावपातळीवर प्रशासनाचे कौतुकास्पद तत्परतेमुळं जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे.

जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.६८ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २००५ इतकी आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५००१९

उपचार सुरू असलेले रूग्ण:२००५

मृत्यू:८०३

एकूण रूग्ण संख्या:५२८२७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment