गांधीगिरी आंदोलन! खड्डेमय शहरात आपले स्वागत आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे चांगलेच गाजले आहे. खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने झाली. मात्र निष्क्रिय प्रशासनामुळे या खड्यांचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे.

यातच कोपरगाव शहरात गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला चांगलीच चपराक लागवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कोपरगाव शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक या रोड वरील खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यात लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने चुना लावून रंगविण्यात आले आहे. “खड्डेमय कोपरगाव शहरात आपले स्वागत” सौजन्य कोपरगाव नगर पालिका व धन्यवाद असे चुन्याने लिहिले तर सर्व खड्ड्यांच्या भोवती फुले टाकण्यात आले. या खड्ड्यात अनेक गाड्या नादुरुस्त होतात.

या खड्यांमुळे अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. राजकीय नेत्यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी स्वच्छ सुंदर रस्त्यांची स्वप्ने कोपरगाव शहरातील नागरिकांना दाखवली होती प्रत्यक्षात आजून तरी शहर व तालुक्यातील जनतेचे सुंदर रस्त्याचे स्वप्न खड्ड्यात गेले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment