Ahmednagar NewsBreakingMaharashtraPolitics

साताऱ्यात झालेल्या शरद पवार यांच्या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांसह अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

भर पावसात शरद पवारांनी घेतलेली सभा ही ऐतिहासिक सभा ठरली आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. आज याच सभेला वर्ष पूर्ण झाले आहे.

यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी त्यांच्या भर पावसातल्या सभेचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी

शरद पवार यांची सभा साताऱ्यात जिल्हा परिषद ग्राऊंड वर आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना जोरदार पाऊस पडत असताना देखील शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण केले होते.

वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावासात केलेला प्रचार आणि त्यांचा उत्साह साताऱ्यासह महाराष्ट्रभर गाजला होता. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवारांनी त्यावेळी दाखवलेली जिद्द पाहून राष्ट्रवादी कार्यकर्त्यां मध्येही उत्साह संचारला होता. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा शरद पवार यांच्या मदतीला होता.

यानंतर शरद पवार यांचे भाषण संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांच्या व्हाट्सअपच्या स्टेट्सला दिसले. आणि आज पुन्हा एकदा हाच व्हिडिओ लोकांच्या स्टेटसला दिसू लागल्याने या घटनेला पुन्हाएकदा उजाळा देण्यात आला आहे. असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button