Ahmednagar News

कांद्याच्या बाजारभावाबाबत खोटी माहिती प्रसारित झाल्याने झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सोशल मीडियात कांद्याच्या बाजारभावाबाबत खोटी माहिती प्रसारित झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला ७७०० ते ८०००, दोन नंबरला ५५०० ते ६०००, तीन नंबरला ४००० ते ४५००, तर गोल्टी कांद्याला ३५०० ते ४२०० रूपये क्विंटल भाव मिळाल्याची

माहिती सोशल मीडिआत प्रसिद्ध झाली. शुक्रवारच्या तुलनेत जाहीर झालेला बाजारभाव उच्चांकी असल्याने कांदा उत्पादकांत संभ्रम निर्माण झाला.

हे खोटा असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात एक नंबरला ५२०० ते ६०००, दोन नंबरला ४२०० ते ५१९५, तीन नंबरला १००० ते ४१९५, तर गोलिटीला ४००० ते ५१०० रूपये बाजारभाव मिळाला.

७ गोण्यांना ८०००, ४५ गोण्यांना ७५००, १२ गोण्यांना ७२००, ६ गोण्यांना ७१००, ४७ गोण्यांना ७०००, १२ गोण्यांना ६६००, तर १०९ गोण्यांना ६५०० रूपये क्विंटल असा अपवादात्मक भाव मिळाला. शनिवारी वांबोरी मोंढ्यावर ५७६७ गोण्यांची आवक झाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button