माजी कृषिमंत्री कडाडले; मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘ती’ वचनपूती करावी

file photo

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.

मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते.

आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन वचनपूर्ती करावी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.

गोधेगाव (ता.नेवासा) येथील मच्छिंद्र जाधव व विजय जाधव या शेतकऱ्यांच्या चार एकर शेतातील कपाशीचे पीक पूर्ण सडून गेले. त्याची शनिवारी बोंडे यांनी पाहणी केली.

दरम्यान. जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

वयाची पन्नाशी गाठलेल्या आजच्या पिढीने कधीच पाहिला नाही असा पाऊस यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून होतोय. सुरुवातीला तो चांगला वाटला.

खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या. कुणालाच वाटलं नाही आज चांगला वाटणारा पाऊस पुढे नकोसा होईल. खरिपाची अनेक पिके पाण्यात गेली. तर रब्बीच्याही पेरण्या लेट झाल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved