अहमदनगर ब्रेकिंग : साडेचार लाखांचा गांजा जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-हरातील कोठला परिसरात एका झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गांज्याचा साठा करण्यात आला असून,त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांना गुप्त बातमीदाराने दिली.

त्यानुसार पोलीस अधीक्षक राठोड यांच्या विशेष पथकाने संबंधित छापा टाकून ४ लाख ४८ हजार ५२० रूपये किमतीचा ११किलो १२३ गॅ्रम गांजा जप्त केला. याप्रकरणी सिराज नवाब शेख याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की, नुकतेच पदभार घेतलेले प्रभारी पोलिस अधीक्षक राठोड यांनी त्यांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

त्यानुसार काल कोठला परिसरात मोठ्या प्रमाणात गांज्याचा साठा करण्यात आल्याची माहिती गुप्त खबऱ्याने राठोड यांना दिली. त्या बातमीच्याआधारे राठोड यांनी उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी,

मंडल निरीक्षक झाडे,उपअधीक्षक ढुमे व विशेष पथकातील कर्मचारी पोहेकॉ.डंगोरे, पोहेकॉ.डहाळे, पोना.भिंगारदिवे, पोना.धामणे, पोना.चव्हाण, पोना.घुले, पोना.दिलीप गायकवाड, पोकॉ.पवार, पोकॉ.घोडे, मपोकॉ.भिंगारदिवे यांच्या मनपा कर्मचाऱ्यांना सोबत घेत

संबंधित ठिकाणी छापा टाकून ४ लाख ४८ हजार ५२० रूपये किमतीचा ११ किलो १२३ गॅ्रम गांजा जप्त केला. याप्रकरणी सिराज नवाब शेख (रा.कोठला) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment