आंदोलक महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत पैसे मिळावेत, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी आम आदमी पक्षाचे जिल्हा समनव्यक किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला.

मोर्चा पालिका कार्यालयात येताच माया जाधव या महिलेने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वांची धावपळ झाली.

या आंदोलनात सुनील पाखरे,अरविंद सोनटक्के,गोरख ढाकणे ,अविनाश टकले ,अमीर शेख ,किरण जाधव,घरकुल संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख ,बिन्ना शेख ,पप्पू भंडारी ,बाळासाहेब ढुमणे ,हबीब शेख, शिवाजी डोमकावळे,गणेश राऊत,माया जाधव,सुलताना शेख, छाया लगारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोर्चासमोर  पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय तोळेकर आले आणि ते अंदोलकांशी चर्चा करीत असताना माया जाधव या घरकुसाच्या लाभार्थ्यी महीलेन अंगावर डिझेल ओतुन घेतले. पोलिस व अंजोलकांनी तिला वेळीच रोखले. यावेळी धावपळ झाली. आंदोलक पोलिस ठाण्य़ात गेले.

पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना दोनवर्षापूर्वी कार्यान्वित करण्यात आली.या घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम काम चालू झाले. मात्र घराचे अर्धवट काम होऊन पुढील रक्कमेचे पैसे मिळत नसल्याने वेळो वेळी आंदोलने करण्यात आली परंतु कोणताच प्रतिसाद या लाभार्थ्यांना मिळत नसल्याने

आज या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. केंद्र शासनाचा निधी या योजनेसाठी न आल्याने शेवटचा हप्ता थकला आहे अशी माहिती पालिका कार्यालयीन प्रमुख यांनी आंदोलकांशी चर्चा दरम्यान दिली. पालिका कार्यालयात आत्महत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment