विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे शाळा कॉलेज अद्यापही बंदच आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा एका विद्यापीठाने आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

कोरोना पाठोपाठ आता परतीचा पाऊस, चक्रीवादळ आणि इंटरनेट तांत्रिक समस्येमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आता यावेळेत होणार परीक्षा :-  21 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या परीक्षा 26 ऑक्टोंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 27 ऑक्टोंबरपासुन घेण्यात येतील.

यासंदर्भातील परिक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे रात्री उशिरा विद्यापीठ प्रशासनाकडुन कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन सॉफ्टवेअरची कमतरता यामुळे अगोदरच परीक्षा विभागाचे नियोजन कोलमडले होते. अशा स्थितीत 17 ऑक्टोंबर पासून या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

पण राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या 21 ऑक्टोंबरपासुन सुरू होणार होत्या. पण राज्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने,

ब-याच भागात विजेचा पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा अडथळा आल्यास ऑनलाईन परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना अडथळा होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment