त्याच्या छळास कंटाळून तिने उचलले आत्महत्येचे पाऊल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- प्रेम प्रकरणातून अनेकदा आत्महत्येच्या घटनां घडत असतात. यामध्ये एकतर्फी प्रेमातून, प्रेमात धोका दिल्याच्या कारणातून अशा घटना घडतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.

संगमनेर शहरातील अठ्ठावीस वर्षीय तरुणीस वारंवार भेटण्यास बोलावून सतत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घारगाव येथील एकाविरोधात संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील पावबाकी रस्ता येथील एका तरुणीस आरोपी सुनील भानुदास फाकटकर याने वारंवार फोन करुन भेटण्याचा तगादा लावला.

तसेच धमकी देऊन वारंवार त्रास देत तिचे जगणे असह्य केले. अखेर या छळास कंटाळून पीडित तरुणीने 18 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान आत्महत्या केली.

या प्रकरणी पोपट आप्पासाहेब गाडेकर (वय 30, रा.राहाता) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सुनील फाकटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परदेशी हे करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment