नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी माजी पालकमंत्री धावले..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे अनेक उभी पिके पाण्यात गेली. कोरोनामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी पीक वाया गेल्याने आर्थिक हतबल झाला.

यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी व नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत तालुक्याचा दौरा केला.

प्रा. राम शिंदे यांनी आज राशीन परिसरात पिकांचे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. होलेवाडी, शिंपोरा, चिलवडी, वायसेवाडी, खेड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यांनी या दौर्‍यात दिला.

दरम्यान नुकतेच राज्यात नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी राजकीय नेतेमंडळी दौरे करत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात यावी अशी मागणी बळीराजा करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment